दिव्यांग बांधवांच्या प्रश्नाबदल पाचवी बैठक निवासी जिल्हाअधिकारी व ऊपजिल्हाअधिकारी सा.यांनी दि.9 नोव्हे.2023 लाख संपन्न आता तरी न्याय मिळेल काय? चंपतराव डाकोरे
नांदेड/ प्रतिनिधी,दि.10
दिव्यांग,वृध्द,निराधार बांधवाना न्याय मिळावा म्हणुन मा. अभिजित राऊत जिल्हाअधिकारी नांदेड यांना दिव्यांग बांधवाबदल आस्था,आपुलकी असल्यामुळे त्यांनी दिव्यांगाना सवलती हक्क मिळावे म्हणुन चार वेळा बैठक घेऊन कनिष्ठाला बैठकीत आदेश देऊन सुध्दा कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वाखालि वरिष्ठांचे आदेश कनिष्ठ मानत नसतील व दिव्यांगाना हक्क देता येत नसेल तर दिव्यांगास स्वईच्छा परवानगी मिळेप्रयत जिल्हाअधिकारी कार्यालय नांदेड येथे बेमुध्दत धरने आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावेळी धरने आंदोलन करु नये संबंधितांची बैठकित न्याय देण्यासाठी बैठकजिल्हाअधिकारी कक्षात घेण्यात आला पण अचानक पणे जिल्हाअधिकारी समाज कल्याण अधिकाऱ्यांना औरंगाबादला बैठक असल्यामुळे
निवासी जिल्हाअधिकारी , उपजिल्हाधिकारी सामान्य व संबंधित अधिकारी यांच्या ऊपस्थित दिव्यांगासाठि दहा महिन्यांत पाचवी बैठक दि.9 नोव्हे.2023 ला जिल्हाअधिकारी कक्ष नांदेड येथे दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,ईतर पदाधिकारी यांच्या समवेत दिव्यांगाच्या पंधरा प्रश्नावर सविस्तर दिड तास चर्चा करून संबधितास न्याय देण्याचे आदेश दिले .
पाचव्या बैठकीत संबंधित अधिकारी वरिष्ठांचे आदेशाचे पालन करून ईश्वरूपि दिव्यांगाना न्याय हक्क देतील कि पुन्हा दिव्यांगाना आंदोलन करण्याची वेळ येईल ते काळच ठरवेल.
या बैठकीला निवासी जिल्हाअधिकारी,ऊपजिल्हाअधिकारी सामान्य विभाग,संबंधित खातेप्रमुख दिव्यांग,वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,ज्ञानेश्वर नवले,दिंगाबर लोणे,गुलाब,गिरे,विठ्ठल बेलकर,विठ्ठल माने,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
असे प्रसिध्दीपत्रक देण्यात आले