16 ते 20 डिसेंबर 2024 या पाच दिवसात ” कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) ” मोहीम राबविणार
जालना/प्रतिनिधी,दि.16
शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील लपलेले कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना बहुविध उपचाराखाली आणणे आवश्यक आहे. याकरीता नियमित/विशेष सर्वेक्षणामध्ये वंचित राहणाऱ्या/दुर्लक्षित राहणाऱ्या गटांवर उदा. विटभट्टी कामगार, खाण कामगार स्थलांतरीत व्यक्ती, बांधकाम मजूर, निवासी/आश्रमशाळेत राहणारे विद्यार्थी, कंपनीत काम करणारे कामगार इ. वर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. वरील गटातील लोक हे कामाकरीता/मजूरीकरीता लवकर घर सोडतात व उशिरा घरी परत येतात. यामुळे अशा व्यक्तीची आरोग्य तपासणी नियमित सर्वेक्षण अथवा कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये होत नाही. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्
यामध्ये 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत अतिजोखमीच्या भागात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) हे अभियान राबविण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यात कुसुम अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या उपेक्षित गटांचे दि.16 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे. जिल्हयात 214 उपेक्षित ठिकाणावर विशेष लक्ष केंद्रित करुन जवळपास 14 हजार 912 व्यक्तींची शारीरीक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी करीता जिल्हयात 123 पथक तयार करण्यात आले आहेत व 8 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.
जोखीमग्रस्त भागातील महीलांची तपासणी आप्शा स्वयंसेविकांमार्फत व पुरुप सभासदाची तपासणी पुरुप आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत केली जाणार आहे. मोहिमेमध्ये शोधलेल्या संशयीत रुग्णांची वैद्यकीय अधिकारी तपासणी करुन निदान करणार आहे. तसेच नविन शोधण्यात आलेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासात असलेल्या व्यक्तींना कुष्ठरोगाची लागण होऊ नये म्हणून रिफाम्पिसिन औषधीची एक मात्रा (पीईपी) देण्यात येणार आहे. तरी तपासणी करीता घरी येणाऱ्या पथकामार्फत तपासणी करुन घेण्यात यावी असे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
कुष्ठरोग लक्षणे :-त्वचेवर फिकट, लालसर बधीर चट्टा व त्या ठिकाणी घाम न येणे.जाड, बधीर, तेलकट / चकाकणारी त्वचा. त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे.हातापायाची बोटे वाकडी असणे, मुंग्या येणे/बधीरता असणे.भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे. त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे.अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. सुधाकर शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.