शिकाऊ उमेदवारीसाठी भरती मेळावा
जालना/प्रतिनिधी,दि.17
मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राकडून जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन दि.21 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला आहे. भरती मेळाव्यात जालना, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्यात सहभागी होतेवेळी उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो सोबत बाळगावा. सर्व व्यवसायातील उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारीसाठीच्या आयोजित भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राच्या सहप्रशिक्षणार्थी सल्लागार तथा प्राचार्य आर.एस.शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.