विद्यार्थी जीवनात शिक्षणास संस्काराची जोड हवी: गुरूपुत्र आदरणीय श्री नितिन भाऊ
छत्रपती संभाजीनगर येथे ऐतिहासिक सामूहिक सरस्वती पूजन सोहळा व विद्यारंभ उत्साहात संपन्न

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.29
दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 28.07.2024 रोजी संभाजीनगर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांचे प्रमुख उपस्थिती होती. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यात संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांतील हजारो पालक व पाल्य सहभागी झाले होते. वेद विज्ञान विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सरस्वती मातेचे सर्वांनी भक्तीभावाने पूजन केले.
गुरूपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ यांनी सोहळ्यास उपस्थित सर्व सेवेकरी पालकांना व पाल्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना “विद्यार्थी जीवनात शिक्षण व संस्कार हे दोन्ही महत्वाचे आहेत” असे नमूद केले.
या सोहळ्यासाठी संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील अनेक शाळा, पालक-पाल्य युवक-युवती व सेवेकरी परिवाराची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.