छ.संभाजीनगर वाहतूक पोलिसांची(ग्रामीण)रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती मोहीम

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी, दि.5
आज (दि.5) रोजी पोलीस अधिक्षक मणिष कलवानिया,सहाय्यक पोलीस अधीक्षक लाझेंवार. वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक किशोर पवार छञपती संभाजी नगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली टोल नाका लाडगाव, करमाड येथे रस्ते सुरक्षा विषयक जन जाग्रुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने वाहने सुरक्षित चालवा,दुचाकी वाहने चालवीत असताना हेल्मेट वापरा, वाहने चालवीत असताना मोबाईल वर बोलणे टाळा अशा प्रकारे वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी Asi लोखंडे, HC 348 कोळेकर, 829 राठोड, PC1723 संतोष गिरी. यांचे मार्गदर्शन लाभले,तसेच लाडगाव टोल नाक्याचे आधिकारी छोठु खान सर.संदिप शिंदे आकुंश बागल सुनिल नायडे यांनी अधिक परिश्रम घेतले.