pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे शाळापयोगी वस्तू आणि कपडे वाटप.

0 3 1 9 7 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

वनवासी कल्याण आश्रम उरण तालुका वतीने रविवार दिनांक ७ जुलै रोजी अक्कादेवी आदिवासी वाडी चिरनेर,उरण येथे वाडी वरील विद्यार्थांसाठी मोफत वह्यावाटप, शालोपयोगी वस्तू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांच्या मागे वनवासी कल्याण आश्रम सदैव पाठीशी उभी आहे फक्त तुम्ही चांगला अभ्यास करा ,काही अडचणी असतील तर आमच्या वाडी वरील कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणा ,आम्ही सारे मिळून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे उरण तालुका सह सचिव कुणाल सिसोदिया यांनी सांगितले.वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहात राहूनही आपल्याला शिकता येईल असेही ते म्हणाले.वाडीवरिल ३५ मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या.आणि ५० भगिनींना साड्या वाटण्यात आल्या.वह्या उरण मधील दानशूर व्यक्तीमत्व जितेंद्र परमार यांच्या वतीने देण्यात आल्या.उरण केगाव मधील सामाजिक कार्यकर्त्या वर्षा अधिकारी आणि जितेंद्र जैन यांचे वतीने उपस्थितांना साडी ,कपडे वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी चिरनेर ग्रामपंचायत सदस्य दीपक कातकरी, वनवासी कल्याण आश्रम जिल्हा हितरक्षा प्रमुख श्रीमती मीराताई पाटील आणि संजय दाते आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 9 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे