धानोरा (रू) भागात नुकसानग्रस्त शेती व पिकांचे पंचनामे

निवघा बाजार/प्रतिनिधी,दि.11
हादगव तालुक्यातील धानोरा (रू) परिसरात गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे व खरिप पिंकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाच्या सुचेनेप्रमाने धानोरा रू परिसरात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. तसेच खरिप पिंकचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेती व पिकांचे पंचनामे करण्यात यावे.आशी मागणी केली होती शुक्रवारपासून महसूल विभाग व कृषी विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.या भागातील कापूस. सोयाबीन.हाळद.व ऊस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सद्य : स्थितीतही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे शेती बांधावर आलेल्या शासकीय कर्मचारी देत आहेत नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करण्यासाठी तालाठी डी व्ही चेव्हाण . पो. पा .अरविंद शिंदे.सरपंच लक्ष्मण शिंदे. कृशिसहायक .वा गजानन चंद्रवंशी हे प्रत्यक्ष जावून पाहणी करीत आहे.