बदनापूर येथे जिल्हा उद्योग केंद्र व एमसीईडीकडून मोफत फॅब्रिकेशन वेल्डिंग वर्क प्रशिक्षणाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.12
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत विशेष घटक प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2024-25 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बदनापूर येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने फॅब्रिकेशन वेल्डिंग वर्क प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्ग एक महिना कालावधीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ट्रॅक्टर, ट्रक, टेबल, खिडकी, शटर, ग्रिल वेल्डिंग, इत्यादीचे प्रात्याक्षिकद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकीय गुणसंपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणी तंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णत: मोफत असून यासाठी लाभार्थी किमान सातवी पास, वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थीना प्रवेश व अधिक माहिती साठी कार्यक्रम आयोजक दीपक सेठी मो. ९६३७५५५३२१, यांच्याशी किंवा एमसीईडीचे विनोद तुपे फोन.नं.०२४८२-२२०५९२ येथे दि. 31 जुलै 2024 पर्यंत संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.