pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जासई हायस्कूलचा तालुकास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात प्रथम क्रमांक

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज,दहागाव विभाग जासई.ता. उरण जि. रायगड. या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात उरण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
उरण तालुका गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील व त्यांच्या तज्ञ पथकाने विद्यालयाचे परीक्षण केले.या विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविलेले वेगवेगळे उपक्रम,स्वच्छता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पालकांचा सहभाग, समाजाचे योगदान या अनेक मुद्द्यांवर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते, विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, चेअरमन – अरुण जगे, ज्येष्ठ स्कूल कमिटी सदस्य नरेश घरत, तसेच स्थानिक स्कूल कमिटी, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ,यांचे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन मिळत असते. विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग हे सर्व सेवकांना बरोबर घेऊन उत्कृष्ट मार्गदर्शन करून शाळेच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस,रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक व दि. रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक साताराचे माजी व्हाईस चेअरमन नुरा शेख यांचाही या पारितोषिक प्राप्तीत मोलाचे सहकार्य आहे. विद्यालयाच्या टेक्नो-सावी शिक्षिका श्रीमती म्हात्रे एम.डी, पाटील एस. सी व इतर सर्व सेवकांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे यशस्वी सादरीकरण केले. शाळेच्या या प्रगतीबद्दल सर्व स्तरातून शाळेविषयी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे