pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विकसित भारत संकल्प यात्रा ; 9 डिसेंबर रोजी दूरदृश्यप्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार लाभार्थ्यांशी संवाद

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे हे हसनाबाद येथील कार्यक्रमास राहणार उपस्थित

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.8

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने शनिवार, दि. 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते  दुपारी 1.00 या कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीव्दारे लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे हे भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे आयोजित कार्यक्रमास  उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांच्या अनुषंगाने नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे. या कार्यक्रमास लाभार्थी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे