गावातील शेतकऱ्यासाठी पोकरा योजना वरदान ठरेल – सरपंच वांजुळे

विरेगाव / गणेश शिदे दि.6
जालना तालुक्यातील चितळी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दुसरा पोकरा अंतर्गत ग्राम विकास कृषी समिती झालेल्या सभेत गठीत करण्यात आली.या समितीत सरपंच सौं.स्वप्ना राजेंद्र वांजुळे यांची या समितीच्या अध्यक्ष सह गावातील शेतकरी गट, महिला बचत गट,प्रगतशील शेतकरी, सेवा सहकारी सोसायटी आशा विविध गटातून १३ सदस्यची निवड या सभेत करण्यात आली.यावेळी पोकरा प्रकल्प विषयी चर्चा करण्यात आली यावेळी सरपंच वांजुळे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा हा नावीन्यपूर्ण प्रकल्प असून नुकताच पोकरा अंतर्गत निवड झालेल्या गावातील सरपंचांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ओळख प्रशिक्षण झाले असुन या योजेनेत शेतकऱ्यांना विविध योजना आहेतच याचबरोबर शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी तर भूमिहीन शेतमजुरी करणाऱ्यांसाठी सुद्धा या योजनेत सहभाग घेता येईल अशा योजनांचा समाविष्ट या योजनेत करण्यात आलेला आहे. म्हणूनच गावातील शेतकऱ्यासाठी पोकरा वरदान ठरेल असे ग्रामविकास कृषी समिती अध्यक्ष सरपंच वांजुळे यांनी सांगितलं याचं बरोबर कृषी सहाय्यक सांजेवार यांनी ऍग्रो स्टाक च्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य असुन शासनाच्या शेतीविषयक विविध योजना शेतकरी ओळखपत्र असणाऱ्यांनाच मिळतील असे त्यांनी सांगितलं व पोकरा संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामसेवक ए.एस.धांडे ग्रामपंचायत सदस्य शेतकरी उपस्थित होते.