स्वरांगी जाधव मिस टिन नवी मुंबई २०२४ ने सन्मानित

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
डॉक्टर स्मायली पॉल मॅडम ह्यांनी पहिल्या ‘क्लासिक फॅशन फिएसस्टा ‘ चे वाशी एक्जीबिशन सेंटर, नवी मुंबई येथे आयोजन केले होते. ह्यात एकूण २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.त्यातून गेल्या एक महिन्यात अनेक राऊंडचे अडथळे पार पाडून फायनल टॉप १० मध्ये स्वरांगीची निवड झाली. युईएस कॉलेज,उरण मध्ये इयत्ता बारावी कॉमर्स मध्ये शिकणारी व कुंभारवाडा,उरण येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात राहणारी,कुमारी स्वरांगी गणेश जाधव हिने त्यानंतर फायनल मध्ये ‘मिस टीन नवी मुंबई २०२४ ‘ तसेच ‘गॉडेस ऑफ एलिगन्स ‘ हे दोन टायटल, ॲक्टर व मॉडेल मिस इंटरनॅशनल वर्ल्ड सुपर मॉडेल २०२२ मिस जुई पागनीस तसेच महागुरू मेरी पॉल मॅडम ह्यांच्या हस्ते स्वरांगी जाधव हिला मिळाले.सदर पुरस्कार मिळाल्याने स्वरांगी जाधव वर सर्वच स्तरातून कौतुक, अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
————————————————————-
स्वरांगी जाधवचा थोडक्यात परिचय :-
स्वरांगी ३ वर्षांची असल्यापासून भरतनाट्यम शिकतेय.’आयसीएसीटी ‘ ह्या अकॅडमी मध्ये स्वरांगीने एकूण ८ वर्ष भरतनाट्यम कोर्स केला, तसेच ३ वर्षे ‘ स्ट्रीट किंग्डम’ मधून ‘ हिपहॉप ‘ शिकली. त्यानंतर उरण परिवर्तन ग्रुप,उरण नृत्य स्पर्धेत सहभागी, तसेच ‘आयसीएसीटी’ आयोजित ‘फेम आयडॉल’ नृत्य स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मुंबई येथील लाला लजपतराय कॉलेज मध्ये शो डान्सचे सादरीकरण केले.उरण जे एन पी टी येथे ‘ फ्लॅश मॉब ‘ मध्ये सहभागी. याशिवाय शिवराज युवा प्रतिष्ठान,उरण आयोजित ग्रुप डान्स मध्ये प्रथम क्रमांक मिळाला.यू ई एस शाळेत हिंदी दिवस व युईएस गॉट टॅलेंट नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.त्यानंतर चिलड्रेन डे निमित्त नृत्य स्पर्धेत सतत २ वर्ष प्रथम क्रमांक, ह्याशिवाय फॅन्सी ड्रेस, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, ४०० रीले धावणे, स्किपिंग करणे इत्यादी शाळेतील विविध स्पर्धांमध्ये स्वरांगीने बक्षीसे मिळविली आहेत. ‘उरंणकर्स’ आयोजित पहील्याच फॅशन स्पर्धेत अंतिम फेरीत पोचली, तर त्याच उरणकर्स आयोजित नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिमन्याशियन व डान्सर अजिंक्य पाटील यांच्या हस्ते मिळाले.यावर्षी द्रोणागिरी स्पोर्ट्स आणि द्रोणगिरी महोत्सव स्पर्धेमध्ये नृत्य स्पर्धेत सहभागी झाली होती.ह्या व्यतिरिक्त कविता रचणे, गाणं गाणे,गिटार वाजवणे, नृत्य दिग्दर्शन करणे, चित्रकला, विणकाम करणे, थोडक्यात कलेशी संबंधित सर्व गोष्टी मनापासून करणे स्वरांगीला आवडते.