दिव्यांग, वृध्द निराधार यांचा लोकप्रतिनिधी, प्रशासन विचार करत नसतील तर येणाऱ्या निवडणुकीत दिव्यांग, वृध्द निराधार विचार करतील -चंपतराव डाकोरे पाटिल

मुखेड/प्रतिनिधी, दि.29
मुखेड तहसिल सभागृहात दिव्यांचा, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,मुखेड येथील स.गा.नि.योनायब तहसीलदार यांच्या ऊपस्थित शेकडो कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली
या बैठकीत तहसिलदार साहेब यांना 13 प्रश्नाचे निवेदन देऊन बैठकित चर्चा झाली त्यात नायब तहसीलदार यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले
पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या नऊ प्रश्नाचे निवेदन देण्यात आले.
दिव्यांचा,वृध्द, निराधार योजना फक्त कागदोपत्री राहातं असतात त्यासाठी आंदोलन निवेदन मोर्चे काढुन न्याय मिळत नसेल तर दिव्यांग, वृध्द निराधार खालिल प्रश्न
1 दिव्यांग बांधवांना आमदार व खासदार निधी त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी निधीची तरतूद असुन लोकप्रतिनिधी जर निधी देत नसतील तर येणाऱ्या निवडणुकीत नोटा किंव्हा बहिष्कार बदल निर्णय घेण्याचा विचार बैठकीत झाला.
2. आमदारांना दरमहा 2,86000 अनुदान वेळेवर मिळते त्यांचे पोट भरत नसेल? तर दिव्यागाना दरमहा दिड हजार रू.कसे भरते? जर बाजुच्या राज्यात सहा हजार मिळते तर महाराष्ट्रात का मिळत नाहि? ज्या दिव्याग, वृध्द निराधाराचे प्रश्न माडण्यासाठि वेळ मिळत नसेल तर दिव्याग,वृध्द निराधार मतदान कशासाठी करावे.
3 ) सतेतील लोकप्रतिनिधी, आपल्या मतासाठी ज्या नागरिकांनी कांहि मागितलं नाहि अशा जेष्ठ नागरिकांना व महिलांना बस प्रवासात सवलत दिली त्याबद्दल अभिनंदन पण ज्या दिव्यांगाना चालता येत नाहि,दिसत नाहि,बोलता येत नाहि अशा दिव्यांगानी बस प्रवास मिळावा म्हणुन अनेक निवेदन देऊन बस सवलत मिळत नाहि.
दिव्यांग, वृध्द, निराधार आपल्या हक्कासाठी शासन, प्रशासन यांन जागे करण्यासाठी अनेक आंदोलने करतात ते लोकप्रतिनिधी ला दिसत नसतील काय? जर दिसत असतील तर त्या दिनदुबळ्याना न्यायासाठी प्रश्न मांडत नसतील ? त्यांच्या मतांसाठी का बरे भिक मागतात?
दिनदुबळ्यानी आता संघटित होऊन आपली शक्ती दाखविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत संघटनेच्या वतीने जे काहि निर्णय होईल ते एकजुटीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनास पंधरा दिवसांत प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांचा,वृध्द, निराधारांना
न्याय हक्क द्या,? नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आपल्या कार्यालयात तिव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे दिला.
मुखेड तालुक्यातील ५८ गावातील दिव्यांगानी निवेदन देत असताना आवकचे कर्मचारी यांनी इतक्या संख्येनी दिलेले निवेदन स्विकारण्यास नकार दिल्यानंतर नायब तहसीलदार भोसिकराना फोनवर माहिती दिली असता त्या कर्मचारी वाटेना सुचना दिल्यानंतर कांहि जनाचे निवेदन स्विकारले तर कांहिजन निवेदन घेतले नाहि अशा कर्मचारी यांना पायबंद करतील काय ,?
या बैठकीत संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,नायब तहसिलदार भोसिकर,ता मुखेड अध्यक्ष मगदुम शेख, दत्तात्रयसोनकांबळे, हेमंत पाटिल,बाबु पवार, कुंचलवाड,शेख दस्तगिर, पांडु सुर्यवंशी,बाबु फुलारी,मानसिंग वडजे,हनुमंत हेळगिरे,शिवपुजे, इत्यादी तिने पन्नास दिव्यांचा, वृध्द निराधार बांधव शा.प्रमुख ऊपस्थित होते.