pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मोर्शीत विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

0 3 8 6 5 4

मोर्शी ता/ प्रतिनिधि,दि.9

पुढकर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उदखेड परिसरात मंगळवारी (9 सप्टें) सकाळी उघडकीस आली. शिवदास वानखडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेच्या माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.शिवदास वानखडे या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली. शेतकरी शिवदास वानखडे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. सदर शेतात या वर्षी खरीप हंगामात मुग, तूर व सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु सततच्या पावसामुळे पिकाची अवस्था दयनीय झाली. त्यामुळे शेती व घराच्या वाटणीचा वाद सुरु झाला आणि ते चिंताग्रस्त झाले. अशाच मानसिक तणावातून शिवदास वानखडे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.या घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर शिवदास वानखडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात उदखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे