जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणीचे आयोजन
जालना/प्रतिनिधी, दि 5
जिजामाता क्रीडा मंडळ किनगाव ता अंबड आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षा साठी आयोजित करण्यात येणाऱ्या 19 वर्ष वयोगटाच्या आतील मुले कबड्डी या खेळासाठी दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता मंडळाच्या मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.या निवडचाचणी साठी ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख 01.01 2007 आहे आणि बारावी पर्यंत शिकत आहे अशा जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि निवड चाचणी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने संजय येळवंते, दिनेश वाघ,विठ्ठल दिवटे,रोहित बिन्नीवाले,अजय काळवणे,आकाश दिवटे इत्यादींनी केले आहे