४५ वर्षांनंतर दिघोडे हायस्कूलचा माजी विद्यार्थ्यांचा दहावीचा वर्ग उत्साहात भरला.
१९८० मध्ये म.गांधी विद्यालय

उरण/प्रतिनिधी, दि.5
दिघोडे (उरण) मध्ये शिकत असलेल्या ५२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रानसई धरणाच्या कुशीतील निसर्गरम्य जेडी जोशी फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात दहावीचा वर्ग त्यावेळच्या गुरुवर्यांच्या उपस्थितीत भरला.
गुरुवर्य ए.डी.पाटील,
साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील,कोल्हे सर, एस आर महाजन, जितेंद्र पिपरे यांचे भावपूर्ण स्वागत विद्यार्थीनी आशा पाटील आणि सर्व विद्यार्थ्यांनी औक्षण करून स्वागत केले.यावेळी प्रमुख अतिथी उरणचे ज्येष्ठ नेते जे.डी.
जोशी, हायस्कूलचे सभापती अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या विद्यार्थ्यांचे सहप्रवासी १४ मृत झालेल्या विद्यार्थीमित्रांना
श्रद्धांजली वाहून जिव्हाळा उभा
केला.विद्यार्थी अशोक पाटील यांनी प्रास्ताविक करून सर्व विद्यार्थ्यांची ओळख करतांना
आजची वस्तुस्थिती ऐकवायला लावून वास्तव उभे केले.अविनाश पाटील यांनी देव पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.कोल्हेसर यांनी जुन्या आठवणीतून विद्यार्थ्यांना राग आणि प्रेमाच्या प्रसंगांना समोर आणले.ए.डी.पाटील यांनी मुख्याध्यापक भूमिका बजावताना केलेले बदल, विद्यार्थी,पालक आणि संस्थेशी जोडलेले संबंध यावर विचार मांडताना आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना कविता सादर केल्या.साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी विशेष सत्काराला उत्तर देताना रायगड भूषण प्रा एल बी पाटील यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देत विद्यार्थ्यांचे भाव मांडले आणि विनोदी कविता गाऊन वातावरण हलके फुलके केले.रोहिदास पाटील,प्रदीप मुंबईकर,सावळाराम पाटील, रोहिदास पाटील, एकनाथ पाटील,शाम पाटील, रामकृष्ण जोशी,अनील पाटील,विजय गोंधळी, अंकुश मोहिते, नरेंद्र एकनाथ, हरिभाऊ कासकर, गणेश घरत,हासुराम पाटील, सुकदेव महाजन,रामा पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी
वर्ग ख-या अर्थांनी उभा केला.रोहिदास ठाकूर यांनी प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्यांची भूमिका मांडली तर प्रदीप मुंबईकर यांनी सर्वांचे आभार मानले.



