शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरील नोंदणीसाठी आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.7
जालना जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मुग 8 हजार 682, उडीद 7 हजार 400 व सोयाबीन 4 हजार 892 दर प्रती क्विंटलप्रमाणे खरेदी व ऑनलाईन नोंदणीसाठी पणन महासंघाने जिल्ह्यात 11 खरेदी केंद्र सुरु केले आहेत. तरी शेतकऱ्यांनी मुग, उडीद व सोयाबिन पिकासाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणीसाठी सातबारा उतारा, नमुना 8-अ, चालु वर्षाचा सातबारावरील पीक पेरा नोंद, बँकेचे पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवर एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.