pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 19 ऑक्टोबरला भरती मेळावा

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.16

आयटीआय उत्तीर्ण व अंतिम वर्षाला पात्र असणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भरती मेळाव्यासाठी सुझूकी मोटर्स गुजरात येथील नामांकित कंपनी सहभाग घेणार आहे. भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणने अनिवार्य राहील. तरी आयटीआय उत्तीर्ण व अंतिम वर्षाला पात्र असणारे फिटर, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर मेकॅनिक, टुल ॲन्ड डाई मेकर, प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ईलेक्ट्रीशिअन, मशिनिष्ठ इत्यादी व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. डी. उखळीकर व सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती आर. एस. शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे