मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.2 राबविणे बाबत.बिटस्तरीय बैठक बिट सावरगाव हडप येथे संपन्न
मार्गदर्शक :- मा.भरत वानखेडे साहेब विस्तार अधिकारी बिट सावरगाव हडप.

जालना/प्रतिनिधी,दि.6
आज हडप सावरगाव येथे बिटस्थरिय बैठक संपन्न झाली याबैठकीतील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे
1) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.2 राबविणे बाबत.(5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट).2) सदर टप्पाचे मूल्यमापन 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट.3) 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान तालुका स्तरीय पथकाची भेट.4) 6 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर ला जिल्हास्तरीय पथक शाळा भेट घेणार आहेत.5) पायाभूत सुविधा बाबत 33 गुण.6) शासन ध्येय धोरण 74 गुण.7) शैक्षणिक संपादणूक 43 गुण.
(एकूण गुण 150)
8) शासन निर्णय 26 जुलै 2024 ची एक प्रत शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे उपलब्ध असावी.9) शाळा स्तरावर आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.10) शालेय स्वच्छता,हँड वॉश स्टेशन,अपंग मुलांना स्वच्छता गृह उपलब्ध करून घेणे.11) शालेय सुरक्षा अंतर्गत शाळा स्तरावर अग्निशमन यंत्र उपलब्ध करून घ्यावे.12) आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शालेय मुलांची समिती स्थापन करण्यात यावी.13) शाळा स्तरावर प्रतिज्ञा फलक लावण्यात यावे.14) शाळा स्तरावर शाळेतील शिक्षकांनी किमान 10 झाडे लावण्याची व्यवस्था करावी.15) इक्को क्लब तयार करणे.16) ओला कचरा व सुका कचरा,पाणी व्यवस्थापन नियोजन तयार करावे.17) शालेय मुलांना क्रीडांगण व विविध खेळाचे नियोजन व आखणी करावी.18) वाचनालय बाबत नोंदी व देवाणघेवाण रजिस्टर नियमित वापर करावा.19) वर्गखोली मध्ये विषय निहाय 20 साहित्य भिंतीवर लावावे.20) मुख्याध्यापक यांनी वर्ग शिक्षक यांना विषय नुसार साहित्य तयार करण्यासाठी सांगण्यात यावे.21) विध्यार्थी ने स्वतः तयार केलेले उपक्रम साहित्य वर्गात लावून बोलक्या भिंती तयार कराव्या.22) शालेय पोषण आहार अंतर्गत परसबाग तयार करून वापर करावा.23) माहिती अधिकार लोकसेवा हमी कायदा अंतर्गत शालेय स्तरावर फिस घेण्याबाबत माहिती उपलब्ध ठेवावी.24) शालेय स्तरावर सर्व लाभाच्या योजनाची प्रिंट काढून फ्रंट बाजूला लावण्यात यावी.25) आधार वैधता,सरल प्रणाली प्रिंट,udise प्रणाली माहिती अपडेट करून घ्यावी,महावाचन चळवळ माहिती,कार्यरत शिक्षकांचे प्रथम दर्शी फोटो लावण्यात यावे.26) मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना वाचन करतांना सेल्फी घेण्याचे सांगावे.27) मेरी मिटी मेरा देश अंतर्गत उपक्रम फोटो अपलोड करावे.28) स्काऊट गाईड व कब बुलबुल योजना नोंदणी करावी.29) शिक्षक पालक संघ,माता पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती व इतर समिती बाबत चार्ट तयार करावे.30) दिव्यांग विद्यार्थी बाबत योजना माहिती तयार करणे.व नोंदणी करणे.
यावेळी मा.भागवत जेटेवाड साहेब केंद्रप्रमुख सावंगी तलान,मा.भालेराव मॅडम केंद्रप्रमुख,मा.उबाळे सर केंद्रप्रमुख उटवद व बिट अंतर्गत सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.