उरण महाविद्यालयात करिअर संसदेचा शपथविधी संपन्न
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
कोकण ज्ञानपीठ उरण कॉलेजमध्ये ‘‘करिअर कट्टा अंतर्गत करिअर संसदेचा’’ शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मंत्रीमंडळ स्वरूपात जबाबदाऱ्या स्वीकारून लोकशाही मूल्यांची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वाल्मीक गरजे हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी त्यांनी या करिअर संसदेचा उपयोग भावी आयुष्यात नेतृत्व विकासासाठी मोलाचा ठरेल असे सांगितले व नवनियुक्त मंत्रिमंडळातील सर्व मंत्री व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मार्गदर्शक प्रा. व्ही.एस. इंदुलकर , प्रा.डॉ. एम.जी. लोणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्रा.डॉ. ए.आर. चव्हाण यांनी केले.विद्यार्थी मंत्रीमंडळ – करिअर कट्टा २०२५, मुख्यमंत्री – प्राप्ती पांगुल, नियोजन मंत्री – आरती पाटील, कायदे व शिस्त पालन मंत्री – अथर्व महाकाळ, सामान्य प्रशासन मंत्री – सिद्धी पाटील, माहिती व प्रसारण मंत्री – उन्मेश महाकाळ, उद्योजकता विकास मंत्री – हर्षल मोढवे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री – मयुरी पाटील, कौशल्य विकास मंत्री – कनिक्षा पाटील, संसदीय कामकाज मंत्री – मृणाल कोळी,महिला व बालकल्याण मंत्री – हेमांकी फळसंकर, सदस्य – शार्दुल गायकवाड, सदस्य – प्रथमेश अधिकारी या विद्यार्थ्यांनी पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली तसेच महाविद्यालयाची शिस्त व विकास यासाठी कटिबद्ध राहुल कार्य करीन असे मान्य केले.
या शपथविधी सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
