दलपतपुर रेती घाटावरून अवैध रेती चोरी सुरूच महसूल विभागाचे दुर्लक्ष
अवैध्य रेती वाहतुकीमुळे शेतीच्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.12
मोर्शी : मोर्शी तालुक्यतील दलपतपुर रेती घाटाचा लिलाव अनेक वर्षापासून करण्यात आला नाही. हा घाट तालुक्यातील मोठया रेती घाटात येतो. यामुळे रेती चोरटयांची नजर या घाटावर असते. दररोज या रेती घाटावरून रेती चोरी करण्यात येत असल्याने रेती चोरटयांमध्येच वाद होत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून वेळीच कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.दलपतपुर येथील रेती घाट वर्धा व अमरावती जिल्हयाच्या सीमेवर आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील रेती माफिया रेती चोरी करीत आहे. निंभार्णी येथिल 2017 सालि निंभार्णी ते राजुरवाडी या मार्गाचे अवैध्य रेती वाहतुकीमुळे मार्गाचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या मार्गाने डांबरीकरण करण्यात आले. दलपतपुर घाटावरून मोठया प्रमाणात रेती चोरी करण्यात येत आहे. दिवस रात्र ट्रॅक्टर च्या सहायाने रेतीची वाहतूक करण्यात येत आहे. परंतु, महसूल विभाग दुर्लक्ष करुन असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपासून रेती माफियांमध्येच वाद होत आहे. एक दुस-यावर जीवघेणे हल्ले करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. रेती माफियांनी गाव परिसरात धुमाकुळ घातल्याने ग्रामस्थ चांगलेच त्रस्त झाले आहे.