pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन

0 1 7 4 7 7

जालना/प्रतिनिधी,दि.8

टंचाईशी निगडीत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02482-223132 आणि 1077 असा आहे.

जालना जिल्हयात सन 2023-24 व 2024-25 अंतर्गत दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे जिल्हयातील जनतेकडून टंचाईशी निगडीत जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या  गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी विषय प्रकरणी दूरध्वनीव्दारे किंवा प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रारी / निवेदने यांचे निरसन टंचाई नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे