दिड हजार रूपये मानधनात दिव्यांग, वृध्द निराधार पडत झडत संघर्ष करणारे कसे जगत असतील याचा मुख्यमंत्री कधी विचार करणार ? चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/प्रतिनिधी,दि.4
महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री,सर्व मंत्री महोदय, आपल्या राज्यातील तिजोरी जनतेसाठी कोण्हि काहि न मागता लाडक्या बहिणीला, लाडक्या भावांना, आजोबा, आजींना अनेक योजना जाहीर केल्याबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद.
पण या राज्यातील जे उपेक्षित दुसऱ्यावर अवलंबून जिवन जगतात कोण्ही आधार देत नसेल तर रस्त्यावर भिक मागुनहि ते अर्धेपाटि ऊपासी जगतात अशा दिव्यांग, वृध्द निराधार बांधवांना न्याय मिळावा म्हणुन ज्यांना चालता येत,नाहि,दिसत नाहि,ऐकु येत नाहि, बोलता येत नाहि त्यांना कोण्हि आधार देत नसल्यामुळे शासन, प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांचा,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर अनेक दिव्यांग संघटनेच्या वतीने अनेक वेळा मोर्चे,धरने आंदोलन,करून न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांग,वृध्द, निराधार बांधवांना न्याय हक्क द्या नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी साठी बेमुदत धरणे आंदोलन करून फक्त आश्वासन देऊन आंदोलन थांबविले जाते,पण या दिनदुबळे दरमहा दिड हजारांत कसे जगत असतील यांचा विचार मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कधी करनार निवडणुका आल्या कि आम्हि दिनदुबळ्याचे कैवारी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधी आपल्या पिढ्यान् पिढ्यांची सोय करण्यासाठि स्वार्थासाठी अनेक पक्ष बदलुन घराणेशाही तुन सत्तेत जाणाऱ्या लोकप्रतिनिधी नी विचार केला पाहिजे दररोज पन्नास रू ते कसे जिवन जगत असतील यांचा विचार करून शेजारच्या राज्यात दरमहा सहा हजार मानधन मिळते ते आपल्या राज्यातील दिव्यांचा, वृध्द निराधार यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घोषित करून दिनदुबळ्याची दिवाळि गोड करावी
जर दिव्यांग, वृध्द निराधाराचा विचार मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ करीत नसतील तर येणाऱ्या निवडणुकीत दिव्यांग, वृध्द निराधार लोकप्रतिनिधी ला जागा दाखवतील ती वेळ येऊ देऊ नये असे आव्हान विनंती दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी प्रसिध्दी दिली