pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 25 ऑक्टोबरला पेंशन अदालतीचे आयोजन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.19

जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी बुधवार दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)  जिल्हा परिषद जालना यांच्या दालनात पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पेंशन अदालतीमध्ये विभाग निहाय  नियोजन करण्यात आले आहे. शिक्षण (प्राथमिक) विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागाचे आयोजन दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत तर सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, पंचायत विभाग, सिंचन विभागासाठी  दुपारी 2:30 ते 3:00 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभागासाठी  दुपारी 3 ते 3:30 वाजेपर्यंतच्या वेळेत पेंशन अदालतीस उपस्थित रहावे. पेंशन अदालतीसाठी प्रलंबित प्रश्न, अर्ज, पोस्टाने, ई-मेलद्वारे किंवा हस्तपोच सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद जालना या ठिकाणी दि.23 ऑक्टोबर 2023  पर्यंत सादर करावेत. ऐनवेळी आलेल्या अर्जाचा अथवा तक्रारीचा या अदालतीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे