pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

समाज कल्याण विभागाकडून 1 ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे आयोजन

0 1 2 1 0 7

जालना/प्रतिनिधी,दि.28 

भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदेशक तत्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावेत अशी तरतूद आहे. रविवार, दि. 1 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाज कल्याण विभागाकडून आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
ज्येष्ठ नागरिक मेळाव्यामध्ये राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची अंमलबजावणी करणेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तहाने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे तसेच शारिरीक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 9 जुलै, 2008 रोजीच्या शासन निर्णयन्वये निर्गमित करण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतूदीनुसार 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 7