pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शहापूर दुर्घटनेत मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत, दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

0 1 1 8 0 7

मुंबई/प्रतिनिधी,दि 1 

शहापूर सरलांबे येथे समृद्धी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानिमित्त आज मुख्यमंत्री पुणे येथे आहेत. अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक याठिकाणी पोहचले असून योग्यरितीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 7

Related Articles