ब्रेकिंग
भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

pub-7425537887339079
अंबड : भारतीय जनता पार्टी स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त घनसावंगी मतदारसंघात भाजपा नेते सतीश घाटगे व माजी आमदार विलासराव खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबड व घनसावंगी शहरातील भाजपा जनसेवा कार्यालयात रविवारी भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर भाजपचा झेंडा फडकावून सेल्फी काढले.
अंबड येथील जनसेवा कार्यालयात भाजपाचे ज्येष्ठ नेते विलासबापू खरात, समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या हस्ते भाजपच्या ध्वज फडकवण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता संमेलनात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊन सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी संबोधन ऐकले.
याप्रसंगी शिवाजी मोरे, प्रेमानंद उढाण, केदार राठी, डॉ. रमेश तारगे, रामेश्वर माने, किरण गुढेकर, ईश्वर धाईत, यांचासह घनसावंगी विधानसभेतील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.