pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे महिलांच्या समस्या सुटाव्यात यासाठी पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाला देण्यात आले निवेदन.

निवेदनाद्वारे समस्या सोडविण्याची केली मागणी

0 1 7 4 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7

उरण शहरात तसेच उरण तालुक्यात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची(प्रसाधनगृहांची )योग्य ती सोय नाही. अनेक महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता गृहे नाहीत. तसेच ज्या ठिकाणी स्वच्छता गृहे आहेत त्या ठिकाणी योग्य ती साफसफाई नाही. योग्य नियोजन नाही. या महत्वाच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विशेषत : महिलांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ही समस्या सोडविण्यात यावी. प्रशासनाने यात लक्ष घालून ही समस्या त्वरित सोडवावी यासाठी बसंत पंचमी उत्सव मंडळ (रजि.)ट्रस्ट तर्फे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम तसेच उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बसंत पंचमी उत्सव मंडळ (रजि.) ट्रस्टचे सचिव सपना सिंह, सदस्य – रेखा यादव, बबिता शर्मा, नीलम सिंग, नितु सिंह, बिनिता यादव, मंजू साह आदी महिला पदाधिकारी सदस्या मोठया प्रमाणात उपस्थित होते. या निवेदनावर प्रतिक्रिया देताना तहसीलदार उद्धव कदम म्हणाले की याबाबत वरिष्ठ अधिकारांना कळवितो.तसेच नगर परिषद अंतर्गत या समस्या येत असल्यामुळे तिथेही आपल्या समस्या कळवितो. समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.तर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सकारात्मक भूमिका घेत उरण पोलीस स्टेशन परिसरात महिला भगिनींसाठी सुसज्ज असे स्वच्छता गृह(प्रसाधनगृह )बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले.याबाबत आपण उरण नगर परिषदेला सुद्धा कळविणार आहे.जे काही मदत करता येईल ते करू असे सतीश निकम यांनी सांगितले. महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे निवेदन देण्यात आले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या गोष्टीचा सतत पाठपुरावा करण्यात येईल असे सचिव सपना सिंह यांनी सांगितले.

बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या मागण्या खालीलप्रमाणे

१) उरण शहरात (मार्केट भागात व इतर ठिकाणी) महिलांसाठी प्रसाधनगृह नाही ते बनविण्यात यावे व त्याची साफ- सफाई नियमित करण्यात यावी.

२) पिरवाडी, समुद्राजवळ महिलांसाठी शौचालय/प्रसाधन गृहाची व्यवस्था करावी.

३) ज्या महिला कामगार आहेत किंवा मोलकरीण, मोलमजुरी करीत आहेत. अशा महिलांना सामाजिक सुरक्षेसंदर्भात सरकारी विमा योजना मोहिम चालवावी.

४) इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयमध्ये ICU व NICU ची सुविधा करावी.

५) सरकारी विद्यालयात शौचालय/प्रसाधन गृहाची व्यवस्था करावी.

६) उरण पोलीस स्टेशन तसेच मोरा सागरी विभाग पोलीस स्टेशन मध्ये महिलां पोलिसांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे