pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी; जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी

0 3 1 3 9 5

जालना/प्रतिनिधी,दि.17

महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-2009 अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला असून त्यात जिल्ह्यातील एकुण 158 गावे टंचाईग्रस्त दर्शविली आहेत. तरी जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात 30 जुन 2025 पर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उदभवावर प्रतिकुल परिणाम करणाऱ्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे,  असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 40, जाफ्राबाद तालुक्यातील 26, भोकरदन तालुक्यातील 54, बदनापूर तालुक्यातील 14 आणि अंबड तालुक्यातील 24 असे एकुण 158 गावांचा टंचाई भासणाऱ्या गावात समावेश करण्यात आलेला आहे. आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार वापरण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व संबंधित तहसीलदारांना आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी टंचाईग्रस्त गावात भूजल अधिनियम-2009 नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.  असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

परिशिष्‍ट अ

जालना जिल्‍हयातील पाणी उपसा करण्‍यास बंदी घातलेल्‍या गावांची यादी सन २०२४-२५

अ.क्र. तालुका गावाचे नाव  अ.क्र. तालुका गावाचे नाव अ.क्र. तालुका गावाचे नाव
1 2 3 4 5 6 7 8 9
1 जाफ्राबाद चापनेर/धोंडखेडा 26 जाफ्राबाद काचनेरा 51 जालना रोहणवाडी
2 जाफ्राबाद शिराळा 27 जालना बठाण बु 52 जालना सोमनाथ जळगाव तांडा
3 जाफ्राबाद वाढोणा 28 जालना वझर 53 जालना सावंगी तलाव
4 जाफ्राबाद भारज बु 29 जालना नसडगाव 54 जालना निरखेडा
5 जाफ्राबाद आंबेगाव 30 जालना पाचनवडगाव 55 जालना खांबेवाडी
6 जाफ्राबाद घानखेडा 31 जालना कोळवाळी 56 जालना तांदुळवाडी खु.
7 जाफ्राबाद आरदखेडा 32 जालना तांदुळवाडी बु. 57 जालना थेरगाव
8 जाफ्राबाद गोकुळवाडी 33 जालना पाथ्रड तांडा 58 जालना वानडगाव
9 जाफ्राबाद नळविहीरा 34 जालना सेवली 59 जालना हस्‍तेपिंपळगाव
10 जाफ्राबाद माहोरा 35 जालना पळसखेडा/कैलासनगर 60 जालना लोंढेवाडी
11 जाफ्राबाद रेपाळा 36 जालना एरंडवडगाव 61 जालना रेवगाव
12 जाफ्राबाद ब्रम्‍हपुरी 37 जालना बोरगाव 62 जालना रामनगर
13 जाफ्राबाद म्‍हसरुळ 38 जालना शंभुसावरगाव 63 जालना विरेगाव
14 जाफ्राबाद पापळ 39 जालना पिंपळवाडी 64 जालना माळीपिंपळगाव
15 जाफ्राबाद हिवरा काबळी 40 जालना हिस्‍वन बु   65 जालना देवमुर्ती
16 जाफ्राबाद हिवराबळी 41 जालना हिस्‍वन खु 66 जालना खरपुडी
17 जाफ्राबाद      शिंदी 42 जालना इस्‍लामवाडी 67 भोकरदन धोंडखेडा
18 जाफ्राबाद भारज खु 43 जालना वरखेड सेवली 68 भोकरदन वडोदतांगडा
19 जाफ्राबाद डावरगाव 44 जालना पाष्‍टा 69 भोकरदन आन्‍वा
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे