pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल स्कुलमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत

0 4 0 8 5 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.20

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडुन भरुन घेवून दि. 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
अमरावती आदिवासी विकासचे अपर आयुक्त यांच्या अधिनस्त प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद, कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 12 जिल्ह्यातील सर्व शासकिय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित, आदिम जमातीमधील विद्यार्थी या स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज दि. 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे संबंधित मुख्याध्यापकांमार्फत सादर करावेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे