ओमनी व्हॅन पुलाच्या सरंक्षण भितींला जाऊन धडकली

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 9
तालुक्यातील शेंदोळा ते मोझरी या नवीन बायपासवर नांदगाव पेठ एमआयडीसी मधील कामगारांना घेवून जाणाऱ्या ओमनी कारचा पुलाला धडकून अपघात झाला. या अपघातात ओमनीमधील नऊ कामगार जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ओमनी व्हॅन पुलाच्या सरंक्षण भितींला जाऊन धडकली. हा अपघात रविवारी ८ जूनला सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास घडला आहे.आशिष सुधाकर गोपाळकर २८, आष्टी, मंगेश उद्धव ठाकरे ३५, सुरवाडी, हर्षद सुरेश रुद्रकार २७, भारसवाडा, वैभव रमेश कुऱ्हाडे २८, जळगाव आर्वी, ऋषभ भाऊराव सव्वालाखे २८, आष्टी, आकाश धनराज जाने २८,अश्विन वामनराव तवर ३१ आणि आकाश घरड २२ अशी जखमींची नावे आहेत. तिवसा येथून नांदगाव पेठ एमआयडीसी येथे कंपनीत हे कामगार जात होते. मोझरी येथील नवीन बायपासने एका पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ओमनी व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेऱ्या पुलावर जाऊन धडकली. अपघातातची माहीती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमीपैकी सहा जणांना उपचारासाठी अमरावतीत आणले होते.