pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना रेल्वे स्थानकाला मंदीर न बनविता मॉ जिजाऊ सृष्टीचे डिझाईन तयार करा: जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे

0 1 2 1 1 2
जालना/प्रतिनिधी, दि.8
जालना रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचा भुमीपुजन सोहळा नुकताच पार पडला असून नवीन रेल्वे स्थानकाच्या इमारतीची प्रतिमा जाहिर करण्यात आली. या नवीन इमारतीवर राजुर येथील गणपती मंदीराची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याने जयभीम सेनेने या प्रतिकृतीस विरोध केलाय. या रेल्वे स्थानकाला मंदीर न बनविता मॉ साहेब जिजाऊ सृष्टीचे डिझाईन तयार करण्यात यावे अशी मागणी जयभीम सेनेने केली आहे. या सदंर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे.
जालना येथे रेल्वे स्थानकाची नवी इमारत तयार होत आहे. त्याची डिझाईन अगोदर अजिंठा वेरूळची प्रतिकृती होती, परंतु केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी इतर धर्मियांच्या भावनांचा विचार न करता मूळ नकाशा बदलून गणपती मंदिराचे डिझाईन प्रस्तावित केले असल्याचे निवदेनात म्हटलं आहे.
औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे सुद्धा ऐतिहासिक अजिंठा वेरूळची डिझाईन बदलून तेथेही मंदिराची डिझाईन केली आहे. या दोन्हीही रेल्वे स्टेशनला तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज तथा मासाहेब जिजाऊंच्या ऐतिहासिक वारसाला बगल देऊन लोकांच्या मनात धार्मिक द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने व 2024 च्या मतदानावर डोळा ठेवून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  षडयंत्र दिसून येत असल्याचेही सुधाकर निकाळजे यांनी म्हटलं आहे. सदरील मालमत्ता ही केंद्रीय रेल्वे मंत्री दानवे यांच्या मालकीची नाही आणि मंदिरच बनवायचे असेल तर त्यांच्या घरावरच तयार करून भक्तांना दान करावे. कोणत्याही शासकीय इमारतीला मंदिर तयार करू नये, तसेच सर्व जाती-धर्माच्या आस्थेचा विचार करूनच राजकीय मंत्र्यांनी नीट वागावे असा इशाराही जयभीम सेनेने दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय या निवेदनावर जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, रोहीदास गंगातिवरे, आण्णासाहेब चित्तेकर, किशोर मघाडे, मधुकर घेवंदे, महेंद्र रत्नपारखे, शेख अख्तर, कैलास बनसोडे, विनोद म्हस्के, खाजा खान, दिपक दांडगे, गौतम म्हस्के आदींच्या स्वक्षर्‍या आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2