pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अखेर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित असलेल्या गीताला निर्माता मिळाला….

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी, दि.28

पृथ्वी ही कुठल्याही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित कष्ट करायच्या तळहातावर आधारलेली आहे असे स्पष्टपणे सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, अल्पशाळा शिकून लेखनीत धाडसी असणारे,विद्रोही असणारे अण्णाभाऊ.आपल्या पोवाड्यातुन सामाजिक प्रबोधन करणारे अण्णाभाऊ,भारतच्या प्रगतीसाठी योगदान देणारे अण्णाभाऊ,भारतच नाही देशाबाहेर ही आपल्या कार्याचा ठसा उमटावणारे ते अण्णाभाऊ..
अश्या महापुरुषावर आधारित असलेल्या,राजेंद्र कसबे लिखित गाण्याला तयार करण्यासाठी निर्माता मिळत नव्हता. परंतु लेखक दिग्दर्शक राजेंद्र कसबे यांनी धाडसी प्रयत्न करून या विषयावर आवाज उठवून
या गीताला निर्माता तयार केला आहे. लवकरच हे गीत रेकॉर्ड होणार आहे. 1आॅगस्टला दिवस कमी असल्यामुळे हे गीत 14 नोव्हेबरला क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त रिलीज होणार आहे.अशी माहिती राजेंद्र कसबे यांनी दिली…
या विषयात राजेंद्र कसबे यांना ममता ऊलवेकर..यांची साथ लाख मोलाची लाभली..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Relate