pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सासुबाईचा साखरपुडा उत्कृष्ट चित्रपट -फिल्म फेस्टिव्हल मध्ये गौरवांकीत..!

0 1 7 4 1 0

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.29

विदर्भ इंटरनॕशनल फिल्म फेस्टिव्हल ,नागपुर येथे नुकत्याच झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सासुबाईचा साखरपुडा’ चित्रपटास ‘बेस्ट फिल्म ‘म्हणुन पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.विदर्भ हिंदी साहित्य संमेलन ,नागपुर येथे अनेक चित्रपटाच्या शर्यतीत “सासुबाईचा साखरपुडा”या चित्रपटास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.यश चौहान यांनी परीक्षक म्हणुन काम पाहिले. त्यांनी चित्रपटाचा वेगळा विषय आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आवश्यक असल्याचे नमुद केले.समाजप्रबोधन आणि मनोरंजन यांची अप्रतिम चित्रकृती असल्याचेही त्यांनी ‘सासुबाईचा साखरपुडा ‘चित्रपटाचे गौरव करतांना सांगितले.डाॕ.विलास उजवणे यांच्या हस्ते मानचिन्ह,शाॕल देण्यात आले.डाॕ.दिलीप आबनावे निर्माता ,दिग्दर्शक ,अभिनेता असुन कथा, पटकथा संवाद बाळासाहेब गोरे , दिलीप प्रभुणे यांचे आहे.चित्रपटात आशुतोष गोरे,श्रध्दा,संगीता पिंगळे,संजिवनी कोंडे देशमुख,पर्व बागमार,अरुण पटवर्धन,दिलीप हल्याळ,पूनम पवार,गितांजली डोंबे, तारा डाके,डाॕ,धनंजय मेहेत्रे,संगीता गुणवंत,रंजना पोवार व इतर कलाकार आहेत.या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे