सातारा येथील नटराजाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भरतनाट्यम नृत्यामध्ये ‘देवयानी महारनवर’

जालना/प्रतिनिधी, दि.22
सातारा येथील ‘उत्तर चिदंबरम मंदिर’ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या नटराजाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केल्या गेलेल्या नृत्य सेवेमध्ये २० फेब्रुवारीला मुंबईमधील गुरु श्रीमती शिवांगी निर्गुण दाभिळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हनी व्हॅली ऍक्टिव्हिटी अकॅडमी आणि चेंबूर फाइन आर्टस सोसायटी या संस्थांमधील शिष्यांनी सुंदर असे भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य सादर केले. महागणपती या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर कर्पूर गौरव करुणावतारम या श्लोका मधून त्यांनी भगवान नटराजाची स्तुती आपल्या मनमोहक नृत्यद्वारे प्रेक्षकांसमोर सादर केली. या नृत्याविष्कारात गुरु शिवांगी दाभिळकर यांना साथ दिली. आर्या माळकर, ईश्वरी दाभिळकर, श्रेया होवाळ, अदित्री दाभिळकर, देवयानी महारनवर, चैत्रा प्रभू, विभा गंगावणे, कस्तुरी जाधव. या नृत्य सेवेत त्यांच्याबरोबर सहभागी झाल्या होत्या. त्यांना गुरु अनुराधा, गुरू मिनाक्षी, गुरु चैताली आणि गुरु दर्शना यांचे मार्गदर्शन लाभले.