pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

टेंभुर्णीकरांना महावितरण कडून भारनियमन

दिवसा सहा-सहा तास लाईट गूल

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.28

जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी शहर,हे वीज समस्येचे माहेरघर बनले असून कामाच्या नावाखाली
दिवसा सहा-सात तास लाईट बंद करून टेंभूर्णीकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे.यावेळी टेंभूर्णी येथील महावितरण कार्यालयाचे अभियंता सेफ यांना फोनवरून विचारणा केली असता, गावात केबल टाकण्याचे काम चालू आहे. व आणखी आठ दहा दिवस अशीच लाईट बंद केली जाणार, व तसे आमच्या वारिष्टाचे देखील मला आदेश आहे. त्यासाठी तुम्ही कुठेही जाऊन तक्रार करू शकता अशा उर्मट भाषेत उत्तरे दिली आहे..
तालुक्यातील टेंभूर्णी हे मोठे शहर असुन येथे राष्ट्रीय कृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँक यासह अनेक पतसंस्था तर आहेच,याही पलीकडे ग्रामीण रुग्णालय, रक्त तपासणीसाठी लॅब, यासह पिठाची गिरणी, आरामाशिन,लाकडी फर्निचर करणारे लहान मोठे व्यवसायिक,वेल्डिंग व्यासाईक,यासह अनेक लहान मोठे व्यवसायिक आपले व्यवसाय करत आहे.
मात्र दुरुस्तीच्या नावाखाली परमिट जवळपास सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत लाईट बंद ठेवून टेंभूर्णीकरांना एकप्रकारे वेठीस धरत आहे.
टेंभूर्णी हे शहर बाजारपेठ असल्यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी असते. अनेक ग्राहक बँकेच्या भरवशावर येथे येतात, सध्या रब्बी हांगमातील पेरणीचे दिवस असल्यामुळे बी – बियाणे खरेदी करावे लागते, तर काहीना रुग्णालयात रक्त तपासनी, एक्सरे,यासारखे उपचार करण्यासाठी लाईट असणे अत्यंत महत्वाचे आहे.ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे तेथील गोरगरीब रुग्णांना लाईट नसल्यामुळे अनेक तपासण्या न करता माघारी निघून जावे लागते. त्यामुळे लाईट बंदचा नेहमी होणारा नेहमीचा त्रास महावितरनणे कमी करावा,
अशी मागणी टेंभूर्णी करांच्या वतीने करण्यात येत आहे.

—————————————————————
विजेसमस्यामुळे बँकिंग सेवा देण्यास आम्ही हतबल – शाखाधिकारी .
. बँकेत परिसरातील नागरिकांची व्यवहार करण्यासाठी गर्दी जमलेली असते. यातच दोन दिवसापासून सकाळी ११ वाजेपासून वीजपुरवठा बंद असल्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत इन्व्हर्टर बॅटरी वर बँकिंग सेवा देता आली. व तेंव्हापासून व्यवहार बंद करावे लागले. अशावेळी नागरिकांना वेळेत व्यवहार न करता आल्यामुळे बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यात अनेकदा गैर समज होऊन वादविवाद होत आहेत.अनेक वेळा दिवसादिवस भार लाईट बंद असते. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना सेवा देताना आम्ही देखील हतबल होत असल्याचे बँक ऑफ बडोदा शाखाधिकारी यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे