pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2026  कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्याबाबत कडक निर्बंध

  “शिक्षण ही राष्ट्रनिर्मितीची पायाभूत शक्ती असून, परीक्षा प्रक्रियेतील प्रामाणिकपणा हा त्याचा आत्मा आहे. कॉपीमुक्त परीक्षा हीच गुणवत्तेची खरी ओळख आहे.”

0 4 0 4 6 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी  ची परीक्षा एकुण 102 परीक्षा उपकेंद्रावर व इयत्ता 12 वीची परीक्षा एकुण 79 परीक्षा उपकेंद्रावर दि. 10 फेब्रुवारी, 2026 ते 18 मार्च, 2026 या कालावधीत जालना जिल्ह्यात पार पडणार आहेत. या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शासन व प्रशासनामार्फत कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने, परीक्षा कालावधीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163लागू करण्यात आले असून, परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी, अनधिकृत प्रवेश, गैरवर्तन तसेच शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारास सक्त मनाई करण्यात आली आहे.

परीक्षा प्रक्रियेत कोणताही परीक्षार्थी, पालक, बाह्य व्यक्ती, खाजगी एजंट किंवा केंद्राशी संबंधित कर्मचारी जर कॉपी, नकल, मोबाईल फोनचा वापर, बनावट ओळखपत्र, प्रश्नपत्रिका फोडणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात सहभागी आढळून आल्यास, त्यांच्यावर गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींविरोधात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 126 तसेच महाराष्ट्र सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) अधिनियम, 1982 चे कलम 7अन्वये थेट गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत.

परीक्षा काळात जालना जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही. कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, परिक्षा केंद्रातील प्रत्येक हॉल मध्ये सी.सी.टी.व्ही   बसविण्यात आलेले आहे. प्रत्ये्क परीक्षा केंद्र परीसरामध्ये   ड्रोनद्वारे टेहाळणी देखील करण्यायत येणार आहे. प्रशासनामार्फत सर्व परीक्षा उपकेंद्रावर बैठे पथक व भरारी पथक नेमण्याेत आलेले आहे. तसेच  पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, डिजिटल पाळत, अचानक तपासणी व तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवा, आमिष किंवा दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, तसेच पालक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेआवाहन जिल्हामदंडाधिकारी तथा जिल्हा दक्षता समीती अध्यक्ष आशिमा यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 6 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे