गोशीन रियु कराटे चा उन्हाळी कॅम्प संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
गोशीन रियु कराटे असोसिएशन यांनी ग्रीन हेरिटेज समर्थ वाडा कर्जत येथे कराटे ट्रेनिंग कॅम्प आयोजित केला होता.त्या कॅम्प मध्ये रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कॅम्प मध्ये स्पोर्ट्स कराटे, सेल डिफेन्स, काता, कु्मिते, चाकू,रायफल शूटिंग यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विघ्नेश विशाल पाटील व नेहा विशाल पाटील यांना फस्ट डिग्री ब्लँक बेल्ट व अंजा माने यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. या कॅम्प चे आयोजन इंडिया प्रेसिडेंट सिहान राजू कोळी यांनी केले.या प्रसंगी गोपाळ दिनकर म्हात्रे, राकेश म्हात्रे, परेश पावस्कर, सुलभा कोळी , निकिता कोळी , विघ्नेश कोळी,कृष्ण कोळी हे इन्स्ट्रक्टर उपस्थित होते.