जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा

जालना/प्रतिनिधी,दि.28
येथील जिल्हा रूग्णालयाच्या वतीने शुक्रवारी जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीस प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी हिरवा झेंडा दाखविला. ही रॅली जिल्हा रूग्णालय सतकर कॉम्प्लेक्स, शिवनगर मार्गे जिल्हा रूग्णालयापर्यंत काढण्यात आली. जिल्हा रूग्णालयात संशयित रूग्णांची काविळ तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना काविळ प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी जिल्हा कावीळ नियंत्रण कार्यक्रम प्रमुख डॉ. प्रशांत बांदल, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राजेंद्र शेजूळ, प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. कुरेशी, औषध निर्माता मनीष जाधव, प्रयोग शाळा तंत्रज्ञ संदीप लुखे, एडस नियंत्रण जिल्हा पर्यवेक्षक राजेश गायकवाड, चंद्रकांत मुंढे, पराग जोशी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.