
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 27
मोर्शी : दलपतपुर सध्या रेती घाट सुरु व्हायचे असल्या मुळे मोर्शी तहसील मधे रेती तस्करी ही आता वर्धा नदी पात्रा तुन मोठ्या प्रमाणत सुरु आहे. आणि प्रशासनाँचा या रेती तस्करी करनाऱ्यावर वर कारवाही का करत नाही हा प्रश्न आता नागरीकां मधे निर्माण झालेला आहे.सध्या रेती घाट बंद असल्या मुळे रेती तस्कर हे वर्धा नदी मधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. दलपतपुर घाटामधून वर्धा नदी मधुन मोठ्या प्रमाणत अवैध रेती तस्करी सुरु आहे.रेती तस्कर रात्रि 12 व सकाळ 5 वाजे च्या दरम्यान केली जाते. नदी मधे मोठया प्रमाणात रेतीचा ठीग लावला जातो काही मजूर नेवून रेती बाहेर काढ़तात व रेती जमा करतात त्या नंतर रेती चा ढीग जमा झाल्या नंतर टैक्टर बोलावून टेथुन रेती नेतात. अस्या प्रकारे सध्या नदी मधून रेती तस्करी सुरु आहे. आणि प्रशासन हे हाथा वर घड़ी तोंडावर हाथ ठेऊन बसून आहे अस सध्या तरी दिसून येत आहे.
अवैध प्रमाणत सुरु असलेली रेती तस्करी थांबनार की सुरुच राहणार प्रशासन करणार का कडक कारवाई हे आता बघाव लागेल.