pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आदर्श विद्यालयात प्रवेशोत्सव दिवस साजरा !

0 3 8 3 5 2

बदनापूर/प्रतिनिधी, दि.16

बदनापूर तालुक्यातील आदर्श विद्यालय सायगाव (डों.) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ प्रवेशोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात आला. तत्पूर्वी शालेय वातावरण निर्मिती करण्यासाठी व चला शाळेला जाऊ या उपक्रमाची जागृती करण्यासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडीने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले व ठिकठिकाणी महिलांनी ग्रंथदिंडीचे औक्षण केले. प्रवेशोत्सवानिमित्त शाळेत इयत्ता ५ वी व इतर वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व समग्र शिक्षा अभियानांतर्गतची शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कोषाध्यक्ष ज्ञानदेव नाना घनघाव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती रविकुमार बोचरे, पो.पा. शत्रुघन बरांडे, नारायण रिठे, मुख्याध्यापक पंढरीनाथ उनवणे व संचालक प्रकाश गवारे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक राजेभाऊ मगर यांनी तर आभार विजय घनघाव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक रमेश रबडे,एकनाथ तांबे, रामकृष्ण पाटील,गोविंद पडूळ,बाबासाहेब पाझडे, दिनकर लाड,विजय घनघाव,आबासाहेब सुपेकर, राजेभाऊ मगर,श्रीम.कविता अहिरराव,श्रीम.रंजना हिवरे व शिक्षकेतर कर्मचारी अशोक मुगदल यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे