जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 29 जानेवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 27
जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समितीमार्फत जिल्हा व निर्यात केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत विकास आयुक्त उद्योग संचालनालय मुंबई यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रातील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, उद्योजकांचे अनुभव इत्यादी बाबींचा समावेश आहे. या कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी उत्पादक संस्था व उत्पादक, प्रक्रीया उत्पादक, क्रेंद व राज्य शासनाचे तसेच संबंधीत उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्ह्यातील बँका, जिल्ह्यातील उद्योजक संघटना,शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार व जिल्हयातील संबंधीत शासकीय यंत्रणांचे प्रमुख यांचे सहकार्याने आयोजित करणे प्रस्तावित आहे.
या कार्यशाळेस जास्तीत जास्त उद्योग घटक, नवउद्योजक,शेतकरी सहकारी उत्पादक संस्था तसेच इतर संबंधीतांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वाय. आर. सारणीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.