pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठा आरक्षण संदर्भात निजामकालीन पुरावे स्विकारून मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाकडे तात्काळ सकारात्मक शिफारस करावी…! – गजानन पाटील वाळके

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी दि.13

आज मराठा आरक्षण संदर्भात मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्याची विहित कार्य पध्दती करण्यासाठी शासनाने नियुक्ती केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती मा. संदीपजी शिंदे व समिती सदस्य जालना दौऱ्यावर आले असता सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष गजानन पाटील वाळके व गणेश सुल्ताने यांनी प्रातिनिधिक स्वरुपात स्वागत केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त मा. मधुकर राजे आर्दड, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपसचिव विजय पवार यांची उपस्थिती होती. मराठा समाजाच्या व्यथा व वेदना शासनापर्यंत पोहोचविण्याचे कामकाज समिती करेल व समाजास न्याय देण्यासाठी नक्कीच पर्यंत करील. असे आश्वासन यावेळी समितीने दिले.

तसेच यावेळी मराठा समाजाची दशा आणि दिशा यावर सविस्तर चर्चा करून समाजाची शैक्षणिक व सामाजिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचे व मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा हे सर्व एकाच असून समजतील सरसागत इतर मागासवर्गीय ५०% च्या आतून आरक्षण दिल्याशिवाय पर्यायच नसल्याची खंत मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष गजानन पाटील वाळके व्यक्त करून समाजचे हाल अपेष्ठ समितीच्या लक्षात आणून दिल्या. तसेच खालीलप्रमाणे सविस्तर निवेदन देण्यात आले :-
मराठवाड्यातील सर्वच मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास असून अनेक आयोगांनी देखील मराठा समाज मागास असल्याचे अनेक दाखल्यातून सिद्ध केलेले आहे. आज मराठवाड्यातील ९९% समाज अतिशय दारिद्ररेषेखालील जीवन जगात आहे, त्याची कोणीही दखल घ्यायला तयार नाही. तसेच मराठवाड्यामध्ये आज रोजी जवळपास ५००० पेक्षा जास्त मराठा ओ.बी.सी. असल्याच्या व कुणबी असल्याची नोंदी सापडलेल्या आहेत. तसेच जि.प. प्रशाला, शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना येथील शालेय अभिलेख्यानुसार पारसी सन १३२९ नुसार ०५ (पाच) नोंदी कुणबी असल्याच्या सापडलेल्या आहेत. येथील शालेय अभिलेखे उर्दू, पारसी, मोडी लिपी व मराठी भाषेत उपलब्ध असून सर्व तपासणी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे सर्वच मराठा समाज कुणबी म्हणजेच ओ.बी.सी. आहेत असे सिद्ध होते.

छ. संभाजीनगर येथे देखील पुरातन कालीन समाजातील सार्वजनिक भांडी सापडलेली असून त्यावर कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. आज काही जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्येकार्यांनी पुरातनकालीन पाणी काढण्याची मोट आणून समितीचे लक्ष वेधले होते, सदरील मोटेवर ‘कुणबी’ लिहिलेले होते. त्याच आधारावर व तर सर्व पुराव्यानुसार मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास सरसकट ओ.बी.सी. आरक्षण देणे शक्य होते. आपल्या समिती कडून व मा. मुख्यमंत्री महोदय यांचेकडून मराठा समजास खूप मोठ्या अशा अपेक्षा आहेत. आपल्या हातून समाजाची निराशा होणार नाही हीच अपेक्षा बाळगतो. निवेदनावर मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष गजानन पाटील वाळके, जिल्हा पदाधिकारी गणेश सुल्ताने, जिजाऊ ब्रिगेडच्या बदनापूर तालुकाध्यक्ष मनीषा पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत.

सोबत : मराठा आरक्षण संदर्भात विविध आयोग तथा समित्यांचा अहवाल सादर करीत आहोत, तो स्विकारून सर्व पुराव्यानुसार मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास सरसकट ओ.बी.सी. आरक्षण तेही ५०% च्या आतील आरक्षण देण्यात यावे, हि नम्र विनंती.

दिनांक : १२/१०/२०२३ आपला स्नेहांकित

ठिकाण : जालना गजानन पाटील वाळके
विभागीय कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, छ. संभाजीनगर

सोबत :-
१) मराठा आरक्षण संदर्भात विविध आयोग तथा समित्यांचा अहवाल, लेखाजोखा
२) जि.प. प्रशाला, शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना येथील शालेय अभिलेख्यानुसार पारसी सन १३२९ नुसार ०५ (पाच) नोंदी कुणबी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे