श्रीमती.जे.बी.के विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.8
टेंभुर्णी शहरातील नामांकित नवभारत शिक्षण संस्थेच्या श्रीमती.जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.आकांक्षा रवींद्र पैठणेची “सेंट्रल गव्हर्नमेंट ए.आय.एम.एस” नागपूर येथे “नर्सिंग ऑफिसर” म्हणून निवड झाली आहे. कु.आकांक्षा रवींद्र पैठणे ही कुंभारझरी सारख्या ग्रामीण भागातील, सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी शिक्षणासाठी टेंभुर्णी. शहरातील श्रीमती.जे. बी.के.विद्यालयात दाखल झाली. मुळातच हुशार,गुणी,नम्र,व मेहनती असलेल्या आकांक्षाने ,आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात मेहनत घेतली, इ.१०वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर, छत्रपती संभाजी नगर येथील नामांकित “ज्ञानदीप फाउंडेशन”चे संचालक. गोविंद काबरा,यांनी “आकांक्षा” ला आपल्या डि.एफ.सी. क्लास मध्ये मोफत प्रवेश दिला, त्या ठिकाणी “निट”वैद्यकीय परिक्षेची पूर्वतयारी करून आकांक्षा रवींद्र पैठणे ही “नर्सिंग अभ्यासक्रमाला” पात्र ठरली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून स्पर्धा परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन “सेंट्रल गव्हर्नमेंट ए.आय.एम.एस.नागपुर” येथे तिची “नर्सिंग ऑफिसर” म्हणून निवड झाली आहे. एका सामान्य कुटुंबातील ही विद्यार्थीनी पालकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे, तसेच डि.एफ.सी.चे संचालक. गोविंद काबरा, विद्यालयातील शिक्षक. एस.बी.बोरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली तीने यशस्वी वाटचाल करीत हे यश संपादीत केले. या अगोदर ही श्रीमती.जे.बी.के विद्यालयातील प्रत्येक वर्षी इ.१० वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांना “छत्रपती संभाजी नगर येथील:- “ज्ञानदीप फाउंडेशनने” मोफत शिक्षणाची व क्लासची सुविधा उपलब्ध करून दिल्या मुळे विद्यालयाचे विद्यार्थी डॉ.उमेश लिंबाजी जाधव (एम.बी.बी.एस,) प्रतिभा सपकाळ (नर्सिंग) हरिदास पुंगळे (रेल्वे लोको पायलट)सोहिल साजिद शेख (बी.फार्मसी) वैश्नवी देशमुख या सारख्या किती तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करता आली आहे. विद्यार्थ्यांना मोफत क्लासची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ज्ञानदीप फाउंडेशनचे योगदानही महत्त्वाचे आहे. नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा, उपाध्यक्ष. जमिर शेख सर, सचिव. सत्यनारायण सोनी, जेष्ठ संचालक. मधुकर निकम,संचालक विश्वनाथ सांगुळे, संचालक. सुभाष राठी, प्रल्हाद टेंभुर्णीकर, संचालक. प्रा.डि.एस. देशमुख, ॲड.प्रेमसुख काबरा, प्रदिप काबरा,प्राचार्य. व्हि.के.जाधव एस.बी.बोरकर, रमेश इंगळे, संजय कुलकर्णी, कैलास भुतेकर, भिवसन ससाणे, डि.एस.उखर्डे, समाधान कांबळे, राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे,प्रा.सुनिल बनसोडे ,प्रा डॉ.अरूण आहेर,प्रा.रामदास भांगे,प्रा के.जी.जाधव,प्रा.गजानन धोटे,प्रा.डॉ.आनंद जाधव, वासुदेव क्षिरसागर, सुनिल सकुंडे,मंजुषा भिलावेकर,एफ.ए.शेख, ज्योतीताई जाधव,राजुभाऊ डोमळे, विजया लंबे, नागोराव देशमुख, दिपक देशमुख, आदींनी आकांक्षा पैठणे हिच्या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.

