माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी विध्यार्थ्याचा निरोप समारंभ संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज नवीन शेवा येथे शिकणाऱ्या 10 वी(S S C) व 12 वी (H S C) आर्टस् व सायन्स च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ बुधवार दिनाकं 14 फेब्रुवारी 2024 रोजी संस्थेचे संस्थापक माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी विध्यार्थ्याना मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की,दहावी व बारावी ही आपल्या जीवनाची पहिली व दुसरी पायरी आहे, येथे आपण यशस्वी झालात तर जीवनात पुढे जीवनात यशस्वी होत जाल म्हणुन थोडे दिवस टीव्ही, मोबाइल पासून दूर राहा व खुप अभ्यास करून गुणवंत होऊन आपले, गुरुजनांचे, आईवडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा आशा शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे चे उपाध्यक्ष व उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे,नवीन शेवा सरपंच सोनल निलेश घरत, मुख्याध्यापक संतोष म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. तर विद्यार्थी यांनी आपले निरोपाचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन, श्री सरस्वती पूजन व स्वागत गीतांनी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास नवीन शेवा तंटामुक्ती अध्यक्ष के एम घरत, संस्थेचे खजिनदार दिनेश घरत, शाखाप्रमुख शैलेश भोईर, उपसरपंच रेखा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अशोक दरणे, मयुरी घरत, प्रणिता भोईर, वैशाली म्हात्रे, निलेश घरत, सुरेश पाटील, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.