गोंदी पोलिसांची गोदापात्रात वाळूमाफियाविरुद्ध मोठी कारवाई अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार हायवा वाहनांना पकडले
हायवा व वाळूसह 48 लाखाचा मुद्देमाल जप्त

विरेगाव / गणेश शिंदे दि.7
गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी आज गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून, त्याची वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
यावेळी पोलिसांनी चार हायवा व वाळुसह 48 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील सिध्देश्वर मंदिर परिसरातील गोदावरी पात्राजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.
गोंदी पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळूमाफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही कामगिरी गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलीस अंमलदार श्री. डोईफोडे, मदन गायकवाड, सिद्दीकी, अविनाश पगारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.