pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था पि़पळगाव मिस्त्री नांदेड येथे उद्घाटन व तालुका स्तरीय जिल्हास्तरीय पदाधिकारी 350 नियुक्ती पत्र वितरण सोहळा ऊत्साहात संपन्न

0 1 1 8 1 4

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.18

नांदेड पासुन जवळच असलेल्या पिंपळगाव मिस्त्री या गावी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था उद्घाटन व तालुका स्तरीय जिल्हा 350 पदाधिकाऱ्याचीनियुक्ती पत्र वितरण सोहळा व संस्थेचे कार्याची माहिती मेळावा अति ऊत्साहा प्रथम दिपप्रज्वलन करुन सोहळाही तालुक्याच्या जिल्हाधिकारी यांचा शाल श्रीफळ नियुक्ती देऊन सत्कार करण्यात आला.
समारोप उपदेश व संस्थेचे ऊदेश ह.भ.प.राम महाराज पांगरेकरानी दि. १३.०२.२०१६ पासून आपण हा ‘आम्ही वारकरी’ नावाचा ग्रुप चालवत आहोत.. या ग्रुपचे उद्दिष्ट म्हणजे परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करणे हाच होता,आहे आणि तो राहणार आहे.. बऱ्याच दिवसापासून मनामध्ये विचार होता की आपल्या ग्रुपला कायदेशीर महत्त्व प्राप्त व्हावे.. आणि आपल्या ग्रुपचे एका सेवाभावी संस्थेमध्ये रूपांतर व्हावे.. जेणेकरून वारकऱ्यांच्या व इतर सर्व संप्रदायातील परमार्थ प्रेमी व्यक्तीच्या न्यायासाठी व हक्कासाठी लढता येईल… यासाठी शासन दरबारी आपली नोंद होणे आवश्यक होते.. म्हणून गतवर्षी पासून आपण आपल्या या परिवाराला सेवाभावी संस्थेचे रूप देण्यासाठी कार्य करत होतो. त्या कार्यास आज रोजी पूर्णत्व प्राप्त झाले आहे.आपल्या संस्थेचा उद्घाटन सोहळा व जिल्हास्तरिय, तालुकानिहाय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य यांची नियुक्ती करून गाव तिथे शाखा स्थापन केली जाणार आहे.. निवड झालेल्या पदाधिकाऱ्याना आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणती कामे करावीत याबाबत अनेकांनी आपापले मत मांडले. आपले प्रेम, आपला आशीर्वाद आणि आपले सहकार्य सदैव सोबत राहू द्या.. सर्वांनी या उद्घाटन सोहळ्यास वेळेतला वेळ काढुन सहभागी उपस्थिताचे आभार कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर महाराज पउयड यांनी मांडले.सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमात व्यंकटराव जाधव प्रभाकर पुय्यड,गंगाधराव हंबर्डे, शिवहार मंदमवाड, शिवाजीराव पांगरिकर, गाडे सर,ईत्यादीने शेकडो पदाधिकारी उपस्थित होते
असे प्रसिध्दीपत्रक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड जिल्हा प्रसिध्दी प्रमुख चंपतराव ठाकरे पाटिल यांनी दिले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4