अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती

पुणे/ आत्माराम ढेकळे,दि.11
पुणेः-येथील चित्रपट क्षेत्रातील कार्यकारी निर्माते स्वानंद देव यांची ‘अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
अटलसेना चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जी.पी त्रिपाठी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उल्हास तावडे तसेच प्रदेश महासचिव अभिजीत आपटे या मान्यवरांच्या सहमतानुसार चित्रपट क्षेत्रात सर्वसामान्यांच्या व निर्माता ,दिग्दर्शक संस्था पदाधिकारी आदींच्या संपर्कात सातत्याने असणारे धडाडीचे व्यक्तिमत्त्व स्वानंद देव यांची ‘अटलसेना चित्रपट कामगार मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.स्वानंद देव हे ‘चित्रपट आणि नाट्यसंस्थेचे अध्यक्ष असुन त्यांनी अनेक मराठी ,हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठी निर्मिती व्यवस्थेचे काम केले आहे.कोल्हापुर महापुर संकटकाळात तेथील नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरविण्याचे कार्य,कोरोना महामारी काळात अनेक कलाकारांना मदत करण्याचे कार्य.तसेच कोराना कालावधी नंतर सर्व नाट्यगृहे बंद असतांना विविध नाट्यगृहात “जस्ट गंम्मत”नावाचे नाटकाचे प्रयोग करणारे ते पहिले निर्माते आहेत.त्यांनी अनेक कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी अनेक प्रकारे मदतीसाठी प्रयत्न केले असल्यामुळे त्यांच्या या कार्याच्या आढाव्यानुसार दखल घेऊन त्यांची या चित्रपट कामगार मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली असल्याचे सर्व नाट्य व सिनेसृष्टीत चर्चा होत आहे.या नियुक्तीमुळे त्यांच्या चाहात्यामध्ये कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.