स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान गुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन
जालना/प्रतिनिधी,दि.11
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत दि.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुष्ठरोग निवारण व आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगारे गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता रन फॉन लेप्रसी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. मॅरेथॉनला जिल्हा रुग्णालयातील पोर्टेबल कोविड केअर युनिट येथुन सुरुवात होणार आहे. मॅरेथॉन नोंदणीसाठी एस.एस.देवकते (मो.9764168350/9763789947) यांच्याशी संपर्क साधता येईल. तरी रन फॉन लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेत माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, आयएमए, संघटना, पुरस्कार प्राप्त क्षेत्रातील खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुष्ठरोग आरोग्य सेवाचे सहायक संचालक डॉ.सुधाकर शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.