pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

0 3 8 4 2 7

जालना/प्रतिनिधी,दि.30

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील श्री.सुरेश एखंडे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला.

भाजपाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी श्री.सुरेश एखंडे यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “भाजपाचे नेतृत्व विकासाभिमुख असून देशहित व लोकहितासाठी झटणारा पक्ष आहे. आपल्या भागाच्या प्रगतीसाठी भाजपात राहून कार्य करणे हीच खरी गरज आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष संजय डोंगरे, एसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सरकटे, सरचिटणीस सुनील पवार, सुहास मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा गायके, गणेश खरात, नागेश अंभोरे, विकास कदम, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, राजेश जोशो, सिद्धिविनायक मुळे, राजाराम जाधव, शिवाजी गवारे, दौलत भुतेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे